Thursday, April 23, 2026
Homeदेश विदेशCJI Gawai On Incident: बुट फेकीच्या घटनेवर अखेर सरन्यायाधीश गवईंची प्रतिक्रिया आली...

CJI Gawai On Incident: बुट फेकीच्या घटनेवर अखेर सरन्यायाधीश गवईंची प्रतिक्रिया आली समोर; “सोमवारी जे घडले त्याने…”

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात यामुळे गोंधळ उडाल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वेळ न दवडता प्रकरणावर युक्तीवाद सुरू ठेवावा, असे निर्देश इतर वकिलांना दिले होते. तीन दिवस या प्रकरणाची देशभरात चर्चा होत असताना सरन्यायाधीश भूषण गवई मात्र शांत होते. आता त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्ट क्रमांक १ मध्ये प्रवेश केला आणि सरन्यायाधीश बसलेल्या पीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत वकिलाचा प्रयत्न हाणून पाडला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सदर वकिलाला सुरक्षा रक्षक घेऊन जात असताना त्यांनी ‘सनातन का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’, अशी घोषणाबाजी केली.

- Advertisement -

यावर सरन्यायाधीश यांनी मौन सोडले असून ते एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हणाले की, “सोमवारी जे घडले, त्याने आम्ही सगळेच काही काळ स्तब्ध झालो होतो. मात्र आता तो आमच्यासाठी एक संपलेला धडा आहे.”

एका खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले की, माझ्या भावाला आणि मला सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेले आहे. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी इतर न्यायमूर्तींशी चर्चा करत असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या घटनेवर न्यायमूर्ती उज्जल भुईयां यांनी कठोर भाष्य करताना म्हटले की, ते देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, हा काही विनोदाचा विषय नाही. ही घटना केवळ व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण संस्थेवर प्रहार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही याबाबत आपले मत व्यक्त करत म्हटले होते की, ही घटना अक्षम्य आहे.

नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. 6 ऑक्टोबर) सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर यांनी कोर्ट क्रमांक १ मध्ये प्रवेश केला आणि सरन्यायाधीश बसलेल्या पीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत वकिलाचा प्रयत्न हाणून पाडला.

घटनेनंतर काय घडले?
घटनेनंतर लगेचच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) ने संबंधित वकील राकेश किशोर यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द केले आहे. याशिवाय, बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने त्यांचा वकिलीचा परवानादेखील निलंबित केला आहे. दरम्यान, या घटनेवरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरुन एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : आकारी पडीत जमीन मोजणी नंतर उर्वरित जमिनीवर उद्योग

0
माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgaon शेती महामंडळाच्या हरिगाव मळ्यातील आकारी पडीत जमिनी मुळ वारसांना सिलिंग अँक्ट प्रमाणे मोजणी करून उर्वरित जमिनी उद्योगास देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर...