Monday, October 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCJP Protest : अभिजीत दीपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका यांची जामिनावर...

CJP Protest : अभिजीत दीपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका यांची जामिनावर सुटका; दिल्लीतील आंदोलनस्थळी जाणार?

नवी दिल्ली | New Delhi

निवडणूक प्रक्रियेतील घोळ आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१०) रोजी कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह त्यांचे सहकारी सौरव दास (Sourav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांना इंदिरा गांधी विमानतळावरून विमानातूनच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पंरतु, आज (दि.११ ऑक्टोबर) रोजी या तिघांचीही जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Abhijeet Dipke : मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजीचे दीर्घ आजाराने निधन

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी आज (रविवारी) सकाळी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी आशुतोष रांका व सौरव दास यांना दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी सुनावणी झाली असता विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांची जामीनावर सुटका केली.दीपके यांच्या वकिलांनी,”अभिजीत दीपके आंदोलन स्थळी गेले नव्हते, त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करण्यात आले नव्हते, असा युक्तिवाद कार्यकारी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर बाजू मांडतांना केला.

हे देखील वाचा : CJP Protest : मोठी बातमी! अभिजीत दीपके, सौरव दास अन् आशुतोष रांकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; थेट विमानातूनच…

दरम्यान, आज (रविवारी) देखील कॉकरोच जनता पार्टीकडून जंतरमंतरवर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. तर सुटका झाल्यानंतर सीजेपीचे तीनही नेते आंदोलनात सहभागी होतील की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “ज्ञानेश कुमार जातील अन् सरकार…”; राहुल गांधींचे मोठे भाकीत, नेमकं काय म्हणाले?

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सी फाॅर्मची माहिती लपविणे अंगलट; पाच नामांकित हॉटेल्सवर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात हॉटेल व लॉजिंगमध्ये वास्तव्यास येणाऱ्या परदेशी नागरिकांसह (Citizen) बाहेरील संशयित व्यक्तींची माहिती, पासपोर्ट, व्हिसा आणि अधिकृत सी-फॉर्मची माहिती पोलीस...