मुंबई | Mumbai
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी विमानतळावरूनच अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) त्यांचे सहकारी सौरव दास (Sourav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांना विमानातूनच ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा : CJP Protest : मोठी बातमी! अभिजीत दीपके, सौरव दास अन् आशुतोष रांकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; थेट विमानातूनच…
त्यानंतर विरोधकांसह कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांनी सरकारकडून हे आंदोलन (Protest) दडपण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसरीकडे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिपकेंच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) संतूक पिंपरी या मूळगावी दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांना दिल्लीतील आंदोलन सोडून महाराष्ट्रात पुन्हा यावे लागण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “ज्ञानेश कुमार जातील अन् सरकार…”; राहुल गांधींचे मोठे भाकीत, नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके यांच्या आजी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु असतानाच आज (शनिवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता दिपके या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असून, त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र, आता अभिजीत दिपके यांचे वडील आपल्या पत्नीसह तातडीने हिंगोलीला रवाना होणार असल्याचे समजते.



