Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा

विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा

मुंबई | Mumbai

राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार (Shinde Group MLA) आणि विरोधीपक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले…

- Advertisement -

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप (BJP) आणि शिंदे गटाची शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात घोषणाबाजी (Sloganism) सुरु होती. बॅनर्स हातात घेऊन विरोधकांवर टीका करत होते. ‘बीएमसीचे खोके…मातोश्री ओके’ तसेच लवासाचे खोके…बारामती ओके अशी सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी सुरु होती.

त्याचवेळी महाविकास आघाडीचे आमदार (Mahavikas Aghadi MLA ) त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या