Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळ्यात खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय

धुळ्यात खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील यापुर्वी कार्यरत असलेली खासगी लसीकरण केंद्र सद्य:स्थितीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिकेतर्फे उपलब्ध लसीकरणाच्या डोसनुसार लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. शासनातर्फे लसीकरणाचे डोस आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध झाल्यावर सर्व मनपा लसीकरण केंद्रांवर देण्यात येतील अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

- Advertisement -

टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरात सद्य:स्थितीत सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला.

शहरात महापालिकेचे 15 नागरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. तर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पुरवठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्यानुसार सद्य:स्थितीत शहरातील 15 पैकी महापालिकेच्या पाच नागरी केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.

खासगी दवाखाने तथा खासगी जागेत लसीकरण केंद्र मिळण्याबाबत मागणी होत आहे. तथापी मर्यादीत लस संख्येमुळे नवीन केंद्र देण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे यापुर्वी कार्यरत असलेल्या खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनामार्फत आवश्यक त्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध झाल्यास महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेले सर्व नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यात येतील. तसेच आवश्यकता भासल्यास खासगी दवाखाने येथेही केंद्र सुरु करण्यात येतील. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. पल्लवी रवंदळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या