Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVideo: किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

Video: किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | Mumbai
कोकणात रविवारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. किल्ले रायगडावर देखील ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळतेय, यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत. किल्ल्याच्या पायऱ्यांवरुन पाण्याचा लोंढा वाहतोय, त्यामुळे या पायऱ्यांवरून खाली उतरणे देखील कठीण झाले आहे.

- Advertisement -

ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले. त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले. ते व्हायरल झाले आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या