Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: "वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो"; CM...

CM Devendra Fadnavis: “वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो”; CM फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिकेत संवाद साधताना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक समस्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर वेळ संपल्यानंतरही मतदान झाले. त्याचा डेटा आम्हाला दिलाच नाही, असे सांगत खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोग पारदर्शक नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आहे. राहुल गांधी कुणाचा अजेंडा राबवत आहेत? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
“राहुल गांधीनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते बदनामी करत आहेत ही बाब निंदनीय आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना आपल्याच देशाची बदनामी विदेशात जाऊन करत असतील तर त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की ते नेमका कुणाचा अजेंडा चालवत आहेत? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, जगभरात फिरून भारताची बदनामी करून मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासर्हता वाढवली तरच मते मिळतील. पण ते करण्याऐवजी ते देशाची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रात हरले, दिल्लीत हरले, हरियाणात हरले. अतिशय बाळबोध प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावे आणि भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

त्यांनी जनतेत जावे आणि विश्वास संपादन करावा
कोणताही देशभक्त विदेशात जाऊन देशाची बदनामी करत नाही. असे करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावे आणि जनतेचा विश्वास संपादन करावा. तरच ते निवडणूक जिंकतील. नाही तर ते जिंकू शकणार नाही. भारताची अशी बदनामी केल्याने त्यांचीच उंची कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे होणे केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटे लागतात. जर ही वेळ लक्षात घेतली तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असे कुठेही घडल्याचे पाहण्यास मिळाले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी कायदाच बदलला, जेणेकरून कुणीच व्हिडीओग्राफीची मागणी करू नये, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन, वयाच्या ८८...

0
दिल्ली । Delhi कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. व्हॅटिकन कार्डिनलच्या म्हणण्यानुसार, पोपने आज स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला....