Wednesday, November 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "काँग्रेसकडून संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न, त्यांना डाव्यांचे..."; CM...

Devendra Fadnavis : “काँग्रेसकडून संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न, त्यांना डाव्यांचे…”; CM फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (मंगळवारी) विरोधी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. यावेळी ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा अशा घोषणा या खासदारांनी (MP) निवडणूक आयुक्तांविरोधात दिल्या.

- Advertisement -

दरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत विरोधी पक्षांच्या खासदारांचा हा मोर्चा पोहोचला असता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तो गेटवरच अडविला. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह इतर खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरच ठिय्या दिला. या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली.

देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न

ते म्हणाले की, काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचे काम करत असून, त्यांच्याकडून संवैधानिक संस्था बदनाम करण्याचे काम सुरु आहे. त्यांना लोकशाहीसह संवैधानिक संस्था नाकारायच्या आहेत. त्याऐवजी कट्टर डाव्यांचे सरकार आणायचे आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. तसेच आंदोलन करून नंतर संविधान नाकारणे ही इंडिया आघाडीची दुसरी पायरी असल्याचे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : India Alliance Protest : राहुल गांधींचा गनिमी कावा; निवडणूक आयोगाच्या दारावर ‘या’ मार्गाने पोहोचले, पण पोलिसांनी रोखलं, नेमकं काय घडलं?

संविधानाच्या प्रति नकारात्मकता तयार करण्याचे काम

पुढे ते म्हणाले, काँग्रेसकडून भारताच्या संवैधानिक संस्थांना बदनाम करून या संस्थांवरचा विश्वास उडेल अशा पद्धतीचे रोज खोटं बोलणे चालू आहे. आपल्या संस्था कोलमडल्या आहेत,त्या न्याय देत नाहीत असे वारंवार सांगितले जात आहे. पुढे संविधान नाकारणे हे काँग्रेसचे षडयंत्र असून, हे आंदोलन त्याचाच भाग आहे. संविधानाच्या प्रति नकारात्मकता तयार करण्याचे काम काँग्रेसकडून सुरु असल्याचा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांना उचलून नेण्याच्या आरोपांवर काय म्हणाले?

पुढे काँग्रेसच्या कार्यालयातून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी उचलून नेल्याच्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “हा धादांत खोटा आरोप असून, मुंबई पोलीस कुणावरही चुकीची कारवाई करत नाहीत. काल आदिवासी शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. तर काहींनी नाशिकमध्ये जल्लोष केला. तसेच काही विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत फोनवरून चर्चा केली. आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन संपू नये असा प्रयत्न एनएसयूआयचे पदाधिकारी करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण

आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न राज्य सरकारने सोडवले असून, त्यांच्याबाबत सरकार सकारात्मक आहे. केवळ आपल्या नेतृत्वासाठी काही नेत्यांकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेस राजकारण करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूकीत विखे-थोरात-गडाखांचा ‘सहकार विकास’ सुसाट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख...