Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIndia Alliance Protest : राहुल गांधींचा गनिमी कावा; निवडणूक आयोगाच्या दारावर 'या'...

India Alliance Protest : राहुल गांधींचा गनिमी कावा; निवडणूक आयोगाच्या दारावर ‘या’ मार्गाने पोहोचले, पण पोलिसांनी रोखलं, नेमकं काय घडलं?

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली | New Delhi

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज (मंगळवारी) केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांना हटविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा असा घोषणा देत या खासदारांनी (MP) निवडणूक आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत विरोधी पक्षांच्या खासदारांचा हा मोर्चा पोहोचला असता पोलिसांनी तो गेटवरच अडविला. त्यामुळे राहुल गांधी, प्रियांका गांधी,अखिलेश यादव, संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरच ठिय्या दिला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

त्यानंतर राहुल गांधीनी (Rahul Gandhi) निवडणूक आयोगाच्या परिसरातील आकाशवाणी भवनातून कार्यालयात शिरत दुसऱ्या बाजूने गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ न देता ताब्यात घेतले. निवडणूक आयोगाच्या कथित वादग्रस्त कारभाराविरोधात, विशेष सखोल पुर्नरनिरीक्षण प्रक्रियेविरोधात(SIR) आणि कथित मतचोरीविरोधात इंडिया आघाडीने आजचा हा मोर्चा काढला आहे. राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वेळ आता आली आहे,अशी प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी यांनी केला व्हिडीओ पोस्ट

दरम्यान, राहुल गांधी यांनी या मोर्चाचा (Morcha) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये “ज्ञानेश, झालं आता… राजीनामा देण्याची वेळ आली आहे… #IndiaAllianceMarch असे म्हटले आहे. या व्हिडीओत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव आणि अन्य काही नेते दिसत आहेत. सगळ्यांच्या हातात फलक बघायला मिळत आहेत. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती बॅरेकेटिंग केले असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान राहुल गांधींनी बॅरेकेटिंगवर चढत हातात तिरंगा फडकवत निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त केला.

१९ पक्ष मोर्चात सहभागी

ज्ञानेश कुमारांविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चात जवळपास १९ पक्ष सहभागी झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. जवळपास तीन किलोमीटर पायी चालत इंडिया आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या जवळ धरणे आंदोलन केले. या मोर्चात आम आदमी पक्ष आणि डीएमके सहभागी झालेले नाही.

मोर्चात कोणते खासदार सहभागी?

या मोर्चात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर खासदार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे अनेक बडे नेते, खासदार सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या

यंत्रमाग

३ लाख २५ हजार यंत्रमागाचा खडखडाट बंद राहणार; मालेगावी आजपासून सात...

0
मालेगाव | प्रतिनिधीसुताचे वाढलेले भाव तसेच कापडाला मीटरमागे एक ते दिड रूपये कमी भाव मिळत असल्याने यंत्रमाग धारकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान दर आठवड्यात होत...