Wednesday, January 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: हनी ट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा खुलासा; म्हणाले, ती व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष,...

Devendra Fadnavis: हनी ट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा खुलासा; म्हणाले, ती व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष, काँग्रेसमधून…

मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधीमंडळ परिसरात हनी ट्रॅप प्रकरणावर गंभीर आरोप करत त्यांनी एक पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रे बनली आहेत. यासंदर्भातील माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचे मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यानंतर आता अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे कुठलेही प्रकरण समोर आलेले नसल्याचे म्हटले आहे. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे, असे म्हणत फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत. महाराष्ट्र याआधी सुसंस्कृत होता आणि आजही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. सरकारने सांगितले तर तो पेनड्राईव्ह दाखवू शकतो असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

“कालपासून एका गोष्टीची सातत्याने चर्चा या सभागृहात होत आहे ती म्हणजे हनीट्रॅप. कोणते हनीट्रॅप विरोधकांनी या सभागृहात आणले ते मला समजतच नाही. नानाभाऊंनी कुठाल बॉम्बच आणला म्हणे. पण नानाभाऊ तो बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला पाहिजे ना? ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. नानाभाऊ कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. इकडे आजी मंत्री आहे तिकडे माजी मंत्री आहे. आजी मंत्री आहे की माजी मंत्री आहे? कोण फसले आहे हनीट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी-माजी मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रार नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

YouTube video player

“अशा संदर्भातील एक तक्रार नाशिकमधून आली होती. एका महिलेने तक्रार केली आणि ती मागेही घेतली. उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातील ही तक्रार होती. आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा उल्लेख करत होता. ती व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष आहे. त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढली आहे. अशाप्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृहातून निघून जाणे योग्य नाही. नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारुढ पक्षाची बोलती बंद करुन टाकायची. महाराष्ट्र याआधी सुसंस्कृत होता आणि आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त जे विष पेरत आहेत त्यांना लगाम लावण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा इकडेतिकडे जात नाही,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला –...

0
मुंबई | Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती विमानतळावर आज (बुधवारी)सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह या भीषण...