Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

इकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

मुंबई | Mumbai
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आणि विद्यार्थी आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. हे विद्यार्थी आंदोलनाला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. तसेच काँग्रेससह विरोधी पक्षही या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते. सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी आमरण उपोषण मागे घेऊनही या आंदोलनाची धग कमी झाली नव्हती. उलट या आंदोलनाची धग अन्य राज्यांमध्ये पसरली होती. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना अखेर नाईलाजाने का होईना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला, देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले आणि या आंदोलनाने व्यापक रूप घेतलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं हतो. तब्बल 25 दिवस त्यांनी उपोषण केलं, त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं. परंतु जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉकरोच जनाता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होते. दिल्लीत घडामोडी सुरु असताना महाराष्ट्रातून एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा; CJP आंदोलनाला मोठं यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित नागपूर दौरा अचानक रद्द करत थेट दिल्लीच्या दिशेने कुच केली आहे. पंढरपूरचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री नागपूरला रवाना होणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यात मोठा बदल झाला असून ते अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

दरम्यान, या बाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून फडणवीस दिल्लीत पोहोचल्यानंतरच याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उद्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंकडून मुंबईत तिरंगा मार्चची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉकरोज जनता पार्टी आणि आंदोलकांचा हा मोठा विजय मानला जात आहे. अखेर कॉकरोज जनता पार्टीने आणि आंदोलकांनी जंतर मंतरवर विजय साजरा केला. नीट पेपरफुटीनंतर दिल्लीत जंतर मंतरवर महिन्याभरापासून आंदोलन सुरू होते. या लढ्याला अखेर यश मिळाल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली आहे. तिकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि इतके राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...