Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : मतदार यादीची सखोल पडताळणी आवश्यक; CM फडणवीसांची पोस्ट, नेमकं...

Devendra Fadnavis : मतदार यादीची सखोल पडताळणी आवश्यक; CM फडणवीसांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?  

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विरोधी पक्षाने मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिम रद्द करण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एसआयआरचे समर्थन केले आहे. नवीन पात्र मतदारांची भर, मृत्यू, स्थलांतर आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेली नोंदणी या कारणाने मतदार याद्यांमध्ये बदल होत राहतात. त्यामुळे मतदार यादीची वेळोवेळी सखोल पडताळणी आवश्यक ठरत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -

पात्र नागरिकांचा मतदार यादीत (Voter List) समावेश आणि कोणताही पात्र नागरिक वगळला जाऊ नये, हे निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे.मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी विस्तृत पुनरीक्षण ही निवडणूक व्यवस्थेतील दीर्घकाळापासूनची प्रक्रिया आहे. सध्याची एसआयआर ही त्याच व्यापक प्रक्रियेचा पुढील टप्पा असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये (Post) देशात आतापर्यंत राबवण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेच्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती दिली आहे. देशात १९५२ ते १९५६ या कालावधीत निवडणूक आयोगाने देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचे विस्तृत पुनरीक्षण केले. त्यानंतर १९५७, १९६१, १९६५, १९६६ पुढे १९८३-८४, १९८७-८९, १९९२, १९९३, १९९५, २००२, २००३ आणि २००४  या कालावधीतही पुनरीक्षण करण्यात आल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

विस्तृत पुनरीक्षण करत असताना घराघरात जाऊन मतदारांकडून माहिती घेणे, मतदार गणना अर्ज वितरित करणे आणि जमा करणे तसेच मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे यांचा समावेश असतो. विस्तृत पुनरीक्षणमध्ये मतदार याद्या मतदार गणनेच्या माध्यमातून नव्याने तयार करण्याची प्रक्रिया केली जाते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2747 गोण्यांची आवक...