Saturday, April 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: "विरोधकांचे किल्ले उद्धवस्त…"; नगरपरिषद निकालांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

CM Devendra Fadnavis: “विरोधकांचे किल्ले उद्धवस्त…”; नगरपरिषद निकालांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

नागपूर | Nagpur
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागले असून राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे. काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या गेल्या तर काही ठिकाणी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. एकूण नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत २७ नगर परिषदांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी २२ ठिकाणी भाजपाने निवडणूक जिंकली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये विजयी नगराध्यक्षांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीचा सफाया केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचा सफाया केला आहे. भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने नगरसेवक निवडणून आणण्याचा रेकॉर्ड केला आहे. २०१७ मध्ये आपले १५०० नगरसेवक होते. यावेळी आपले ३ हजारांच्या वर नगसेवक निवडून आले आहेत. एकूण नगरसेवकांच्या ४८ टक्के नगरसेवक आपल्या पक्षाचे निवडून आले आहेत. महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. विश्वास आणि विकासाचे राजकारण मोदींनी देशपातळीवर केले आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याला प्रतिसाद मिळतो आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला. मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच २०१७ च्या निवडणुकीमध्ये आपणच १ नंबर पक्ष होतो. यावेळी जवळपास ३ हजारांच्या वर नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. सहा पक्ष आणि इतक्या आघाड्या त्यामध्ये अपक्ष उमेदवार त्यामध्येही भाजपाने ही कामगिरी केली आहे. इतके जास्त नगरसेवक कोणत्याच पक्षाचे यापूर्वी निवडून आले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधकांचे किल्ले उदध्दवस्थ
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला एक मोठे जनमत आपल्याला मिळाले आहे. नागपूरमध्येही आपला अभूतपूर्व विजय झाला आहे. अनेक विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्तच झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण उत्तम यश मिळवले आहे. विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. मी कालपासून अनेक अभिनंदनं स्वीकारतो आहे. त्याचे खरे मानकरी माझ्यासमोर बसलेले तुम्ही आहात. मी त्याचा वाटेकरी आहे मात्र या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By-election : राहुरीत योग्यवेळी उमेदवार जाहीर करणार नी निवडणूकही...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहीत योग्यवेळी उमेदवार...