Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "हे डरपोक लोक लपून..."; CM फडणवीसांची टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी...

Devendra Fadnavis : “हे डरपोक लोक लपून…”; CM फडणवीसांची टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर (Actor Tiger Shroff) रविवारी संध्याकाळी जुहू परिसरात झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या सत्रामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात टायगर सुखरूप असून तो थोडक्यात बचावला आहे, परंतु या गोळीबारात त्याचा कार चालक (फिरदौस) आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका आणि पोलिसांची कारवाई

दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ही अत्यंत निंदनीय घटना असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हे डरपोक लोक लपून येऊन हल्ला करतात. मात्र, यामागील मास्टरमाइंड (आका) आणि हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा संयुक्तपणे काम करतील. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. टायगर श्रॉफशी फोनवर चर्चा करून त्याला पूर्ण सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे”, असे त्यांनी म्हटले.

हल्लेखोरांच्या शोधार्थ १५ विशेष पथके

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) व जुहू पोलिसांनी (Juhu Police) या प्रकरणी १५ विशेष पथके तयार केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

नेमकी घटना कशी घडली?

रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुहू येथील एका टर्फवर फुटबॉल खेळून टायगर आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून घरी निघाला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी तो चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत असतानाच, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कारवर बेछूट गोळीबार केला. वर्दळीच्या व जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३५० मीटर अंतरावर ही थरारक घटना घडली.

दरम्यान, एका चाहत्याच्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण थरार कॅप्चर झाला आहे. व्हिडिओनुसार, एका हल्लेखोराचे पिस्तूल अचानक जाम झाल्यामुळे आणि गोळी अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. चालकाला दुखापत झाल्याचे लक्षात येताच टायगरने प्रसंगावधान राखत स्वतः कारचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर आरोपी अंधेरी रेल्वे स्थानक परिसрत त्यांची पल्सर दुचाकी सोडून पसार झाले. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना…; प्रताप सरनाईकांच्या विधानाची जोरदार चर्चा

0
मुंबई । Mumbai शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा आज मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. एकीकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू असतानाच,...