Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदहशतवादविरोधी यंत्रणा आता एकाच छत्राखाली! फोर्स वनचे नियंत्रण ATS कडे; महाराष्ट्र सरकारचा...

दहशतवादविरोधी यंत्रणा आता एकाच छत्राखाली! फोर्स वनचे नियंत्रण ATS कडे; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विशेष कमांडो पथक असलेल्या फोर्स वनचे नियंत्रण आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात ATS कडे देण्यात आले आहे. यापुढे फोर्स वन आणि ATS एकाच नेतृत्वाखाली काम करणार आहेत. या निर्णयामुळे दहशतवादी हल्ला किंवा अन्य गंभीर सुरक्षा संकटाच्या वेळी दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सोपे होणार आहे. याबाबत गृह विभागाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडो पथकाची गरज लक्षात आली. त्यानंतर फोर्स वन या विशेष कमांडो युनिटची स्थापना करण्यात आली. दहशतवादी हल्ल्यांना तातडीने प्रत्युत्तर देणे, दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांची सुटका करणे आणि महत्त्वाच्या सरकारी तसेच इतर ठिकाणांचे संरक्षण करणे ही या पथकाची प्रमुख कामे आहेत.

- Advertisement -

दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक

२६/११ मुंबई हल्ल्यानंतर फोर्स वनची स्थापना
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आणल्या होत्या. या हल्ल्याच्या वेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (NSG) कमांडोंना दिल्लीहून मुंबईत पोहोचण्यासाठी वेळ लागला होता.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्वतंत्र आणि अत्याधुनिक कमांडो दल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २ एप्रिल २००९ रोजी शासन निर्णयाद्वारे फोर्स वनची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण आणि विशेष कार्यपद्धती देण्यात आली. राज्यात दहशतवादी हल्ला झाल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणणे, नागरिकांची सुटका करणे आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे, ही या पथकाची प्रमुख जबाबदारी आहे.

दोन स्वतंत्र कमांड सेंटरमुळे निर्माण होणारा गोंधळ टळणार?
दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर प्रसंगी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अशा वेळी वेगवेगळ्या यंत्रणांकडून आदेश मिळाल्यास निर्णय प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः कमांडो पथकाला कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कारवाई करायची, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असते. एकाच नेतृत्वाखाली ATS आणि फोर्स वन काम करणार असल्याने संभाव्य दुहेरी नियंत्रणाचा प्रश्न कमी होऊ शकतो. गुप्तचर माहिती, तपास, कारवाईचे नियोजन आणि कमांडो पथकाची तैनाती यामध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल.

ताज्या बातम्या

Amitabh Bachchan : अमिताभ अन् अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी;...

0
मुंबई | Mumbai बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan and Abhishek Bachchan) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी...