Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections: ताफा अडवत 'गद्दार'च्या दिल्या घोषणा; CM शिंदे संतापले, थेट...

Maharashtra Assembly Elections: ताफा अडवत ‘गद्दार’च्या दिल्या घोषणा; CM शिंदे संतापले, थेट कार्यालयात जाऊन जाब विचारला

मुंबई | Mumbai
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारसभा आटपून जात असताना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला तसेच गद्दार म्हणून डिवचण्याचा देखील प्रयत्न केला.

चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीत उमेदवारी करत आहेत. त्यांच्या कार्यालयाबाहेरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले पहायला मिळाले.

- Advertisement -

नेमके काय घडले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदिवली मतदार संघाचे शिंदे सेनेचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांचा विरुद्ध काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांच्यात लढत होत आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांच्या प्रचारार्थ चांदिवलीत सभा घेतली. सभा आटपून ते मुंबईने दिशेने निघालेले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी; ठाकरेंचा प्रतिप्रश्न, आजही मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो?

संतोष कटके यानी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे हे त्यानंतर संतापले. संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्याने काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रचंड चिडले. चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट गाडीतून खाली उतरून कार्यकर्त्यांना जाब विचारला. समोरच उमेदवाराचे पक्ष कार्यालय होते. तिथे जाऊन तुम्हाला तुमचे नेते असेच शिकवतात का? असे चिडून मुख्यमंत्र्यांनी विचारले. तसेच घोषणाबाजी करणाऱ्यांची नावे लिहून घ्या, असे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या