Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; मुख्यमंत्री शिंदेंनी केली 'या' योजनेची घोषणा

ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; मुख्यमंत्री शिंदेंनी केली ‘या’ योजनेची घोषणा

मुंबई | Mumbai

काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सरकारचा (Mahayuti Government) पावसाळी अधिवेशनामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी महिलावर्ग, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : तटकरेंच्या ‘त्या’ विधानाचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, “जनतेने त्यांना…”

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्ही काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक योजना जाहीर केल्या.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली. बेरोजगार तरुणांसाठी योजना केली. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. शेतकऱ्यासांठी निर्णय घेतला. वारकऱ्यांसाठीही निर्णय घेतला. आज आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्ष्यवेधी आणली होती.त्यांनी मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना आणावी अशी मागणी केली होती.

हे देखील वाचा : Nashik News : ग्रामीण पाेलिसांचे डाेंगर दऱ्यांतील हातभट्ट्यांवर छापे

ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाची इच्छा असते. पण सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Mukhyamantri Teertha Darshan Yojana) सुरू करावी अशी मागणी होती. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसे इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना आर्थिक अडचणीमुळे जाता येत नाही. त्यामुळे ज्यांना जिथे जायचे आहे. त्यांना तिथे घेऊन जाणार आहे. त्यासाठीच ही योजना आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : प्लास्टिक बंदीबाबत मनपा व्यापक मोहीम राबविणार

तसेच शिंदे पुढे म्हणाले की, “अनेक आमदार (MLA) दरवर्षी आपआपल्या मतदारसंघातून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जातात.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...