Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबच्चू कडूंच्या 'त्या' मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

बच्चू कडूंच्या ‘त्या’ मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

नवी दिल्ली | New Delhi

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून नवीन निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी केली होती. त्यांची ही मागणी अखेर मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे…

- Advertisement -

दिव्यांगांच्या समस्या (Problems of the disabled) तातडीने सोडवण्यासाठी तसेच योग्य रितीने न्याय मिळावा यासाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कडू यांनी अनेक आंदोलने देखील केली. अखेर त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, मागणी मान्य झाल्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या