Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Eknath Shinde : मला आज आनंद आहे की, लाखो मुंबईकरांना मोठा...

CM Eknath Shinde : मला आज आनंद आहे की, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतला. आजच्या बैठकीत राज्य सरकारने मुंबईतील पाचही टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी टोल माफी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जवळपास ८० हजार वाहन चालकांना फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री शेतकरी योजना तशी मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच हा निर्णय निवडणुकांपुरता नाही, पर्मनंट असल्याचे देखील ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असणाऱ्या टोलनाक्यावर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे टोलमध्ये सूटमध्ये मिळावी अशी अनेक वर्षाची मागणी होती.मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी मी आंदोलन केले होते, कोर्टात देखील गेलो. मला आज आनंद आहे की, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे इंधन वाचेल, प्रदूषण होणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, कायमस्वरुपी आहे. सर्व कामांची पोचपावती जनता देईल.

- Advertisement -

त्यांनी पुढे म्हटले की, “हा निर्णय निवडणुकीपूरता नाही. हा निर्णय कायमस्वरुपी आहे. राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये आश्वासन दिले आणि निवडणुका जिंकल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत सांगितले. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक आधार त्यांना नाही. आम्ही कुठल्याही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणणेल्या नाहीत. ही जनतेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आणि ती पूर्ण केल्याचे समाधान आम्हाला आहे. या सर्व कामांची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्की देईल”.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...