Friday, May 3, 2024
Homeनगरसहकारी साखर कार्यकारी संचालक पदाचे पात्रता यादीसाठीची वयोमर्यादा 55 वर्ष करण्याची मागणी

सहकारी साखर कार्यकारी संचालक पदाचे पात्रता यादीसाठीची वयोमर्यादा 55 वर्ष करण्याची मागणी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

सहकारी साखर कारखान्यांचे (Co-Operative Sugar Factories) कार्यकारी संचालक पदाचे पात्रता यादी निकष नियमावलीमध्ये (Criteria Rules) कमाल वयोमर्यादेची असलेली वयाची अट 50 वरून 55 वर्ष करावी अशी मागणी (Demand) राज्यातील साखर उद्योगात कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाने केली आहे.

- Advertisement -

राज्य शासनाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने (Department of Co-operation, Marketing and Textiles) दि.18 एप्रिल 2022 रोजी परिपत्रक काढून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल करणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक पदाचे निकष नियमावलीमध्ये कमाल वयोमर्यादा 50 वर्ष अशी केलेली आहे.

परंतु राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील काही खाते प्रमुख या वयोमर्यादेमुळे साखर कारखान्यातील खातेप्रमुख म्हणून काम करित असलेले प्रदीर्घ अनुभवी उमेदवार कार्यकारी संचालक पात्रतेच्या परिक्षेपासून वंचित राहणार आहेत. म्हणून वयोमर्यादेची असलेली वयाची अट 50 वरून 55 वर्ष करावी अशी मागणी आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने संचालक मंळळाचे दि. 10 मे 2022 रोजीच्या सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा करून कार्यकारी संचालकांचे पॅनलसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष ऐवजी 55 वर्ष करण्याचा ठराव पारित करून तो राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविलेला आहे.

त्यात नवीन पॅनेल करण्याची प्रक्रीया 7 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असल्याने बरेच अनुभवी उमेदवार इतर सर्व निकष पूर्ण करित असून देखिल या संधी पासून अकारण वंचित होत आहेत. परीणामी कनिष्ठ पातळीचे अधिकारी वरीष्ठ पातळीच्या अधिकार्‍यांना (संधी दिना वंचित राहिल्याने) छेद करून वरीष्ठ झाल्यास व्यवस्थापनेत नाराजी होऊन काम करणे अडचणीचे होईल.

कोवीड-19 रोगराईमुळे गेली 2 से 25 वर्षांचा अकारण व्यय झाल्याने त्या दरम्यान वयोमानाप्रमाणे पात्र असणार्‍या मात्र त्यामुळे काळ दवडला गेल्याने आता अपात्र ठरणार्‍या चांगल्या उमेदवारांवर अन्याय होवू नये हे पाहणे महत्वाचे राहील. म्हणून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांची नवीन पॅनल बनविण्यासाठी प्रदिर्घ अनुभव उमेदवारांची आवश्यकता लक्षात घेता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष वरून 55 वर्ष पर्यंत करण्याची मागणी केलेली आहे.

सात वर्षापेक्षा जास्त कालावधीने निघालेली निवड प्रक्रियेची अधिसूचना अमलात येईपर्यंत अनेक खातेप्रमुख 50 शीच्या पार पोहचले आहेत. खरेतर यासाठी 1 जानेवारी 22 रोजी वय गृहीत धरता आले असते किंवा वयाची मर्यादा वाढविता आली असती. विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड याबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती आहे. न्याय मिळवण्यासाठी अन्यायग्रस्त खातेप्रमुखांनी संघटित होऊन सरकार दरबारी आणि न्यायालयात दाद मागणे गरजेचे आहे.

– किरण शेलार, चीफ केमिस्ट श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या