Friday, May 3, 2024
Homeनगर26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकर्‍यांचा मोर्चा

26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकर्‍यांचा मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येत्या 26 तारखेला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हमाल पंचायत येथे बुधवारी (दि.18) शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची बैठक पार पडली.

- Advertisement -

हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित गुरुवारी (दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महापालिका कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, बापू राशीनकर, सतीश पवार, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.

टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शेतकरी विरोधी तीन कायदे, शिक्षक, पालक विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागू करणे आदी विविध मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या