Monday, December 2, 2024
Homeनाशिकनाशिक - बंगळुरू विमानसेवेला प्रारंभ

नाशिक – बंगळुरू विमानसेवेला प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकहून बंगळूरूसाठी आज पहिले विमान उड्डाण प्रवाशांंच्या उदंड प्रतिसादात झाले. पहिल्याच फेरीमध्ये 367 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

देशांतर्गत मुख्य शहरांना जोडण्याची मागणी उद्योग क्षेत्रातील सातत्याने केली जात होती. या मागणीच्या पाठबळ मिळत नाशिक-दिल्ली विमानसेवा सक्षमपणे सुरू झाली. त्यासोबतच नाशिक-हैदराबाद, नाशिक-अहमदाबाद या सेवा ही अखंडीपणे सुरू आहेत. नाशिक-कोलकत्ता नाशिक-बंगळूरु सेवा सुरू करावी अशी सातत्याने मागणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर बंगळूरू शहराला जोडणारी सेवा आजपासून सुरु करण्यात आली.बंगळूरुवरुन दुपारी 2.30 वाजता निघून नाशिकला 4.20 ला विमान पोहोचणार आहे. तर नाशिकहून सायंकाळी 4.50 ला निघून बंगळूरूला 6.30 ला पोहोचणार आहे. प्रत्यक्षात बंगळूरू ही औद्योगिकनगरी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांचे या ठिकाणी मोठमोठे कारखाने उभारलेले आहेत, त्यांच्याच शाखा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बंगळूरु सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी उद्योजक करीत होते. या मागणीला प्रतिसाद देत इंडीगो कंपनीने नाशिक- बंगळूरू सेवेला आज प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी बंगळूरूवरून नाशिकसाठी 189 प्रवाशांनी लाभ घेतला. तर नाशिकहून बंगळूरूसाठी 178 प्रवाशांनी लाभ घेतला.

बंगळुरू सेवा सुरू होण्याने नाशिकला उद्योग आयटी क्षेत्र व धार्मिक पर्यटनाला मोठी संधी निर्माण होणार आहे त्यामुळे निश्चितच ही विमान सेवा नाशिकच्या उद्योग विश्वाची एक संजीवनी ठरण्याची शक्यता आहे.
-मनीष रावल एव्हिएशन उपसमिती

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या