Thursday, July 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजव्यावसायिक गॅस सिलेंडर १८३ रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक गॅस सिलेंडर १८३ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १८३ रुपयांची कपात जाहीर केली आहे. सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत.

या दरकपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात काही प्रमाणात घट होणार आहे. सलग काही महिन्यांतील दरबदलांनंतर यावेळी झालेली मोठी कपात व्यावसायिक ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती ग्राहकांना पूर्वीचेच दर लागू राहणार आहेत.

ताज्या बातम्या

आरोग्य विभागात पाच हजार पदांची भरती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल....