Friday, July 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी शहरात ‘दोन दिवसा आड’ पाणी पुरवठ्याचा निर्णय

दिंडोरी शहरात ‘दोन दिवसा आड’ पाणी पुरवठ्याचा निर्णय

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दिंडोरी शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले असून शहराची जीवनवाहिनी असलेल्या ओझरखेड धरणातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. सध्या धरणात केवळ 25.67 टक्के इतकाच मर्यादित पाणीसाठा शिल्लक राहिल्याने दिंडोरी नगरपंचायतीने कडक निर्णय घेतला आहे. शहरात सद्यस्थितीत सुरू असलेला ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा आता तातडीने बंद करण्यात येणार असून, आगामी सोमवार दि. 6 जुलै 2026 पासून संपूर्ण शहराला ‘दोन दिवस आड’ पाणीपुरवठा केला जाणार आहे. तरी नागरिकांनी दिंडोरी नगरपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

दिंडोरी शहराला ओझरखेड धरणातून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत शहराला एक दिवस आड पाणी देऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने किंवा धरणातील पाणीसाठा कमालीचा घटल्याने चिंता वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या 25.67 % पाणीसाठ्याचा विचार करता जर पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा सुरू ठेवला तर आगामी काळात शहराला अत्यंत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीचे हे धोरण स्वीकारले आहे.

येत्या सोमवारपासून दि. 6 जुलै रोजीपासून शहरात दोन दिवस आड पाणी सोडले जाणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे, अंगणात टाकणे किंवा इतर कारणांसाठी करून पाणी वाया घालवू नये, त्याचप्रमाणे ओझरखेड धरणातील पाणीसाठा अतिशय अल्प झाला आहे. पुढील काळात शहरावर मोठे पाणी संकट ओढवू नये, म्हणून पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात हा बदल करणे अपरिहार्य झाले आहे. दिंडोरी शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आशा कराटे, उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे, पाणी पुरवठा व स्वच्छता सभापती ज्योती देशमुख, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...