Tuesday, April 28, 2026
Homeदेश विदेशLPG Price Hike: आधीच टंचाईच्या झळा, त्यात महागाईचा भडका; महिन्याच्या पहिल्याच दिवशी...

LPG Price Hike: आधीच टंचाईच्या झळा, त्यात महागाईचा भडका; महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG च्या सिलेंडरच्या किमतीत दरवाढ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे देशात आधीच इंधन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती असताना, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ५ किलोच्या एफटीएल सिलिंडरचे दरही ५१ रुपयांनी वधारले आहेत. विशेष म्हणजे, या वर्षातील ही पाचवी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा हा थेट परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

देशातील हॉटेल, लघू खानपान व्यवसाय संकटात सापडले असतानाच सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नसल्याने मोठ्या हॉटेल व्यावसायिकांपासून खानावळींपर्यंत सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न उभा राहिला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सरकारकडून वाढवण्यात आला असला, तरी अद्यापही तुटवडा जाणवत आहे. यातच आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्याने अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

लष्करी विमानाचा संपर्क तुटला अन् थेट पहाडाला जाऊन धडकलं; २३ अधिकाऱ्यांसह ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

१९ किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून महाग होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी तो १,८८४.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकातामध्ये सिलेंडरची किंमत २२०८ रुपये, मुंबईत २०३१ रुपये आणि चेन्नईत २२४६.५० रुपये झाली आहे. पाटणामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २३६५ आणि जयपूरमध्ये २०३१ पर्यंत वाढली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती वापराच्या (१४.२ किलो) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ताज्या बातम्या

Crime News : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केल्याची घटना रविवारी (26 एप्रिल) रात्री 10 वाजताच्या सुमारास...