Tuesday, July 23, 2024
Homeनगरजावळे यांनी घाईघाईने बांधकाम परवानगी दिली

जावळे यांनी घाईघाईने बांधकाम परवानगी दिली

लाच प्रकरण || अटकपूर्ववर फिर्यादीच्यावतीने युक्तिवाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांनी लाच मागितल्याची तक्रार 18 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. 19 जून व 20 जून रोजी पंचांसमोर पडताळणी झाली. त्यानंतर जावळे यांनी घाईघाईने बांधकाम परवानगी दिली. त्यांच्या या कृतीतून गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होतो. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तिवाद फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. अभिजीत पुप्पाल यांनी केला. या अर्जावर आता आज (बुधवार) सुनावणी होऊन निर्णय देण्यात येणार आहे.

बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त जावळे व स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त जावळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सरकार पक्षाकडून लेखी म्हणणे सादर करण्यात आले आहे. काल (मंगळवारी) झालेल्या सुनावणीत फिर्यादीचे वकील अ‍ॅड. पुप्पाल यांनी युक्तीवाद केला.

फिर्यादीत संपूर्ण घटनाक्रम असल्याकडे लक्ष वेधत आयुक्त जावळे यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. जामीन अर्जावर आता बुधवारी (आज) सुनावणी होणार आहे. यात सरकार पक्षाकडून अ‍ॅड. अनिल घोडके व जावळे यांच्या वतीने अ‍ॅड.सतीश गुगळे युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या