Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर नगरपरिषदेच्या सहा विषय समिती सदस्यांची निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या सहा विषय समिती सदस्यांची निवड

संगमनेर (प्रतिनिधी)-

संगमनेर नगर परिषदेच्या सहा विषय समिती सदस्यांची निवड काल झाली.

- Advertisement -

पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पक्ष प्रतोद विश्वास मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पुंड व सर्व नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते. सदस्यांच्या या निवडी सन 2020-21 करीता करण्यात आल्या आहेत. निवडीकामी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, राजेंद्र गुंजाळ यांनी सहाय्य केले.

विषय समिती व सदस्य पुढीलप्रमाणेः- सार्वजनिक बांधकाम समिती- सोनाली शिंदे, सदस्य सुनंदा दिघे, नुरमोहंमद शेख, किशोर पवार, सुहासिनी गुंजाळ, नितीन अभंग, किशोर टोकसे, वसीम शेख, योगेश जाजू, शिक्षण समिती- रुपाली औटी, नुरमोहंमद शेख, योगिता पवार, शैलेश कलंत्री, वृषाली भडांगे, शाहनवाज खान, हिरालाल पगडाल, रिजवान शेख, प्रियंका भरीतकर, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती- रुपाली औटी, सुमित्रा दिड्डी, इब्राहीम देशमुख, सुहासिनी गुंजाळ, मनिषा भळगट, नितीन अभंग, राजेंद्र वाकचौरे, शैलेश कलंत्री, शाहनवाज खान, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती-बाळासाहेब पवार, इब्राहीम देशमुख, गजेंद्र अभंग, राजेंद्र वाकचौरे, मालती डाके, किशोर टोकसे, योगिता पवार, वसीम शेख, रिजवान शेख, नियोजन आणि विकास समिती-कुंदन लहामगे, बाळासाहेब पवार, शमा शेख, किशोर पवार, गजेेंद्र अभंग, राजेंद्र वाकचौरे, शैलेश कलंत्री, वसीम शेख, हिरालाल पगडाल, महिला व बाल कल्याण समिती-सोनाली शिंदे, रुपाली औटी, शमा शेख, शबाना बेपारी, सुहासिनी गुंजाळ, मनिषा भळगट, योगिता पवार, योगेश जाजू, प्रियंका भरीतकर.

- Advertisment -

ताज्या बातम्या