Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमAhilyanagar : काँग्रेस नगरसेवकाला थेट दक्षिण आफ्रिकेतून धमकी

Ahilyanagar : काँग्रेस नगरसेवकाला थेट दक्षिण आफ्रिकेतून धमकी

स्टेटमेंट दिले नाही तर बदनामीचा इशारा || गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुकुंदनगर परिसरातील वॉर्ड क्रमांक चारमधील काँग्रेसचे नगरसेवक शम्स समीउल्ला खान (वय 30, रा. गोविंदपुरा) यांना इंस्टाग्रामवर मेसेज करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगरमध्ये नगरसेवकाला दक्षिण आफ्रिकेतून धमकी दिली गेल्याने खळबळ उडाली आहे. येत्या 24 तासांत काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर तुझा व्हिडिओ टाकून तुझी इंस्टाग्रामवर बदनामी करेन, अशी धमकी दिली गेली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, धमकीचा हा प्रकार खोडसाळपणाचा आहे की नुकत्याच झालेल्या मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शम्स खान यांनी बुधवारी (12 ऑगस्ट) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुळ मुकुंदनगर येथील व सध्या दक्षिण आफ्रिका येथे राहत असलेल्या आकीब असीफ सय्यद (वय 30) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शम्स खान हे भिंगार परिसरातील गोविंदपुरा येथे राहतात. मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना एका इंस्टाग्राम आयडीवरून मेसेज आला. संशयित आकीब असीफ सय्यद याने हा मेसेज पाठवला होता.

येत्या 24 तासांत काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर तुझा व्हिडिओ टाकून तुझी इंस्टाग्रामवर बदनामी करेन, अशी धमकी संशयित आरोपीने दिली. या धमकीमुळे नगरसेवक शम्स खान यांनी बुधवारी दुपारी कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अहमद इनामदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परदेशात बसून दिलेल्या या धमकीमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस सायबर यंत्रणेच्या मदतीने तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...