Friday, May 1, 2026
HomeराजकीयRahul Gandhi : मतचोरीच्या तक्रारींसाठी राहुल गांधींचे अभियान; वेबसाईट आणि मिस्डकॉल नंबर...

Rahul Gandhi : मतचोरीच्या तक्रारींसाठी राहुल गांधींचे अभियान; वेबसाईट आणि मिस्डकॉल नंबर केला जारी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतचोरीवरून भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असा आरोप करत या संदर्भात पुरावे देखील दिले. त्यामुळे निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांनाही घाम (Election Commission) फुटला आहे. त्यानंतर आता याविरोधात राहुल गांधी यांनी मिस्डकॉल आणि एक वेबसाइट बनवत एक अभियान लाँच केले आहे.

- Advertisement -

राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले की, “मतांची (Vote) चोरी ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः तिचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील व्हा आणि या मागणीला (Demand) पाठिंबा द्या. http://votechori.in/ecdemand या वेबसाईटला भेट द्या किंवा ९६५०००३४२० वर मिस्ड कॉल द्या. ही लोकशाहीच्या रक्षणासाठीची लढाई आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या अभियानाची (Campaign) माहिती देताना राहुल गांधी यांनी सांगितले की, मतांची चोरी एक व्यक्ती, एक मत या तत्वावर हल्ला आहे. स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुकीसाठी योग्य मतदार यादी असायलाच हवी. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने निवडणुकीत गडबड झाल्याचे आरोप पुन्हा केले आहेत.

पुरावे आणि तथ्यांसह वक्तव्ये करा – निवडणूक आयोग

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत आयोगावर गंभीर आरोप केले होते. यावर निवडणूक आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव प्रकरणाचा उल्लेख केला होता. परंतु, या प्रकरणी २०१८ मध्ये कार्यवाही करण्यात आली होती अशी माहिती आयोगाने दिली. राहुल गांधी यांनी केलेले आरोप तथ्यांवर आधारीत नाहीत. यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्याा नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह वक्तव्ये केली पाहिजेत अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...