Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअनैतिक संगत असलेले सरकार...'; विजय वडेट्टावार यांची राज्य सरकारवर सडकून टीका

अनैतिक संगत असलेले सरकार…’; विजय वडेट्टावार यांची राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकार आता पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपण राज्य सरकारच्या चाहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली.

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी (शरद पवार) अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) अंबादास दानवे, शेकाप जयंत पाटील, सपा अबू आझमी उपस्थित होते.

“हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरंतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. २०१३ मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तोच भाव आत्ता मिळत असेल, तर शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले जात आहे.

हे ही वाचा : “उद्यापासून खोके सरकारच्या…”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महायुतीने राज्याला खड्यात घातले आहे, हे अनैतिक संगत असलेले सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील त्यांच्या फुगलेल्या छातीची हवा काढण्याचे काम जनतेने केले त्यांचे विशेष अभिनंदन आहे. जनाधार गमवलेल्या या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. तिन्ही पक्षांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली.

“खरंतर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर १८ टक्के जीएसटी लावते, दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना ५ टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना ३ टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना २ टक्के जीएसटी, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. जीएसटी कुठे लावावी हे या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचे भानसुद्धा नाही. अत्यंविधीच्या प्रत्येक सामानावर सरकारने १८ टक्के जीएसटी लावला आहे. त्यामुळे आता या सरकारने मरण ही महाग केलेय का? हा प्रश्न उपस्थित होतोय.

५० किलो च्या युरीयाच्या बॅगवर ५० रूपयाची वाढ केली पण युरीयाचे वजन मात्र ४० किलो केले. कांदा निर्यात नाकारली जाते. केंद्रातले सरकार शेतकरी विरोधी आहे. आणि इथले नेते त्याला समर्थन देतात. हे त्रिकृटाचे घोटाळेबाज , टेंडरबाज सरकार आहे. दलालांना प्रत्येक मजल्यावर केबीन दिले. तिथे ते तोडपाणी करत आहे, अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या