Thursday, July 2, 2026
Homeदेश विदेशअयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात

सार्वमत

रुद्राभिषेकानंतर रचली पहिली वीट, करोनाचे संकट संपल्यानंतर येणार वेग
अयोध्या – अयोध्या येथील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या बांधकामाला बुधवारपासून औपचारिक प्रारंभ झाला आहे. कुबेर टिला येथील भगवान महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आल्यानंतर राममंदिराची पहिली वीट रचण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजता मंदिर बांधकामाचा विधि सुरू झाला. सुमारे दोन तास रुद्राभिषेक, पूजा आणि आरती झाली. त्यानंतर मंदिराची पहिली वीट रचण्यात आली. करोनाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या भौतिक दूरता नियमाचे पालन करताना काही निवडक साधू-संतांनाच परवानगी होती. हे सर्व जण विशिष्ट अंतर राखूनच या विधित सहभागी झाले होते.

- Advertisement -

प्रभू रामचंद्रांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी महादेवाची पूजा करून रुद्राभिषेक केला होता. तीच परंपरा आम्ही आज कायम ठेवली, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे प्रवक्ते कमलनयन दास यांनी दिली. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या वतीने कमलनयन दास यांनी हा विधि पार पाडला. यात 25 साधू व संत सहभागी होते.

राममंदिराच्या बांधकामाला आज आम्ही औपचारिक सुरुवात केली असली, तरी या कामाला करोनाचे संकट संपल्यानंतरच खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे. तोपर्यंत या परिसरात किरकोळ कामे होत राहतील, असे त्यांनी सांगितले.

28 वर्षांनंतर रुद्राभिषेक
महंत दास यांनी सांगितले, रामाचे भव्य मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे, हीच इच्छा मनात ठेवून रुद्राभिषेक करण्यात आला.  आज 28 वर्षांनंतर रामजन्मभूमी परिसरात रुद्राभिषेक करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींना होते निमंत्रण
राममंदिराचे बांधकाम सुरू करण्याच्या या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नृत्यगोपाल दास यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन, त्यांना औपचारिक निमंत्रण दिले होते. मात्र, करोना संकटामुळे आणि इतर कारणांमुळे मोदी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...