Friday, May 3, 2024
Homeनाशिकखंडित वीजपुरवठ्याने ग्राहक त्रस्त

खंडित वीजपुरवठ्याने ग्राहक त्रस्त

शिरवाडे वणी । वार्ताहर Shirwade Wani

परिसरात भारनियमनाव्यतिरिक्तही वीज (Electricity) गायब होत असल्याने घरगुती वीज ग्राहक, शेतकरी (farmer), व्यावसायिक, उद्योजक त्रस्त झाले आहेत. भारनियमन वाढत असताना वीजबिलात (Electricity bill) मात्र मोठी वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने (Power Distribution Company) मीटर रीडिंगप्रमाणे (Meter reading) वीजबिल द्यावे व यातही अतिरिक्त कर कमी करावे, अशी मागणी वीजग्राहक करत आहे.

- Advertisement -

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाने उशिरा थैमान घातल्यामुळे खरीप हंगामातील उशिरा लागवड झालेल्या टोमॅटो (tomato), सिमला मिरची, कांदे तसेच पहिल्या टप्प्यात छाटणी झालेल्या द्राक्षबागांना वेळोवेळी ठिबक सिंचनद्वारे (Drip irrigation) पाणी देऊन तसेच खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळ कांद्याचे रोपे (Summer onion seedlings) तयार करणे व लाल कांद्याच्या झालेल्या लागवडींना पाणी देऊन त्यापासून उत्पादन घेणे गरजेचे आहे.

परंतु वीजवितरण कंपनीच्या ठरलेल्या वीजभारनियमना व्यतिरिक्त ठरलेल्या वेळी मधील दर अर्ध्या तासाला वीज बंद करण्याचे विचित्र प्रकार केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग याबाबत नाराजी व्यक्त करीत आहे. शेती पिकांना वेळेवर पाणी न दिल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान सोसावे लागणार आहे. वीजवितरण कंपनीने वीजभारनियमनात आठ तास विज देत असताना अजून एक तास कमी केला तरी चालेल परंतु ठरलेल्या वेळेत वीज घालवण्याचे प्रकार बंद करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतीबरोबरच विजेवर चालणारी पिठाची चक्की, शेती अवजारे बनवणारे कारखाने व इतर व्यवसाय वीजभारनियमनाच्या ठरलेल्या वेळेत पुरेपुर वीजपुरवठा होत नसल्यामुळे या धंद्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अधून-मधून वीज घालवण्याच्या प्रकारांमुळे शेतकरी वर्गासह शेतीला जोडून पूरक असलेले व्यवसायिक तसेच विजेवर चालत असणारे व्यवसाय सुरळीतपणे चालत नसल्यामुळे वीजवितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करीत आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये वीजवितरण कंपनी मार्फत मीटरची रिडींग घेतले.

परंतु रीडिंग प्रमाणे बिल न देताच सलग पाच महिने ग्राहकाला ठराविक युनिटप्रमाणे बिल देऊन नंतर मिटर चालू असताना नादुरुस्त मीटर दाखवून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या हातात दिले जात आहे व बिल कमी करण्यासंदर्भात ग्राहकाला अगोदर वीजबिल भरावे लागत असून नंतर वीजबिल कमी करण्यासाठी अर्ज करावा लागत आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुमचे विजबिल तपासून कमी असल्यास पुढच्या बिलात कमी लागून येईल व वाढीव असल्यास पुढच्या बिलात वाढवून येईल अशी ग्राहकाला वीजवितरण कंपनी मार्फत समज देण्यात येत आहे.

विजबिल वाढीसंदर्भात वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना जाब विचारला असताना कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे त्याचे खापर पूर्वीच्या कर्मचार्‍यांवर फोडण्याचे प्रकार दिसून येत आहे. वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराची झळ सध्या तरी ग्राहकांच्या खिशालाच बसत आहे. असे असताना देखील सध्याच्या स्थितीत परिसरात सक्तीची वीजबिल वसुली सुरू असून वीज रोहित्र बंद करणे, घरगुती विज तोडणीचे प्रकार देखील घडतांना दिसत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करून वीज बिलामध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शिरवाडे वणी सह परिसरातील शेतकरी, व्यवसायिक व वीज ग्राहकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या