Tuesday, July 16, 2024
Homeनगरठेकेदाराची मनपा अधिकार्‍याला दमदाटी

ठेकेदाराची मनपा अधिकार्‍याला दमदाटी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

- Advertisement -

महापालिकेच्या शहर अभियंत्यांना ठेकेदाराने अरेरावी व दमदाटी केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गुलमोहोर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून सिमेंटचे उभे केलेले खांब काढण्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्यानंतर हा प्रकार घडला आहे. नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे मनपाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शहर अभियंता सुरेश इथापे यांनी बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीचे मेहेर यांच्याविरूध्द हा तक्रार अर्ज दिला आहे. गुलमोहोर रोडवर सुरभि हॉस्पिटल शेजारी व त्यापुढे आणखी एका ठिकाणी, आशा दोन ठिकाणी रस्त्यामध्ये सिमेंटचे खांब उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्यामुळे मे. बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनी यांना अनेक वेळा अडथळा हटविण्याबाबत सूचना दिल्या. पत्र देऊन लेखी कळविले. तरीही अडथळे हटविलेले नाहीत. बुधवारी दुपारी मेहेर कार्यालयात आले असता, त्यांना रस्त्यामध्ये उभे केलेले सिमेंट काँक्रिटचे पोल कोणाच्या परवानगीने उभे केले? आपणांस अनेकवेळा तोंडी व लेखी कळवूनही का काढले नाहीत? आपण अपघाताची वाट पहात आहात का? अशी विचारणा केली असता, त्यांनी उध्दटपणे वर्तन केले. अरेरावीची भाषा करत दमदाटी करून शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला आहे. याबाबत योग्य कायदेशीर कारवाई करावी, असे शहर अभियंता इथापे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या