Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजParinay Fuke: 'शिवसेनेचा बाप मीच', भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य; महायुतीत...

Parinay Fuke: ‘शिवसेनेचा बाप मीच’, भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य; महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेसेना संतप्त

भंडारा | Bhandara
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत वाद उफाळण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे नेते यांनी परिणय फुके यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर १२ तासांत माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेनेचा बाप मीच असे वक्तव्य भंडारा येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना परिणय फुके यांनी हे वक्तव्य केले. ज्यानंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

आमदार परिणय फुके म्हणाले की, माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु त्यादिवशी माझ्या चांगले लक्षात आले, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचे कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्के माहिती झाले, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते. या सगळ्या आरोपांकडे लक्ष न देता आपण आपले काम ताकदीने सुरु ठेवले पाहिजे आणि पक्ष वाढवण्याचे काम केले पाहिजे. लोक आपला विरोध करत असतील तर आपण ते सगळ्यांपुढे सांगतो. आज मी इथे मान्य करतो आणि आभारही मानतो की मला विधान परिषदेवर नेण्याचे काम हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” असे परिणय फुके म्हणाले.

- Advertisement -

बँकेच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिंदेसेनेत वाद उफाळून आलेत. त्यात भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यात शिंदेसेनेने भाजपा आमदार परिणय फुके यांच्यावर आरोप केले. शिंदेसेनेच्या या आरोपांना उत्तर देताना फुके यांनी स्थानिक आमदार नरेंद्र भोडेंकर यांच्यावर निशाणा साधला. “मौका देने वाले को धोका आणि धोका देने वाले को मौका कभी नही देता..” ज्यांनी पक्षासाठी काम केले अशा कार्यकर्त्यांसाठी मी अर्ध्या रात्रीसुद्धा उपस्थित आहे परंतु ज्यांनी मला धोका दिला, त्यांना मात्र मी सोडत नाही असंही फुके यांनी म्हटले आहे.

परिणय फुके यांच्या विधानावर शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्याने केलेल्या विधानाला पक्षाचे विधान म्हणून बघता कामा नये. अशी विधाने करण्यापासून सर्वांनी संयम राखायला हवा. हे युतीचे शासन आहे. लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, आपल्याला मोठ्या अपेक्षांनी लोकांनी निवडून दिले आहे. तेव्हा जनतेची जास्तीत जास्त सेवा कशी होईल यावर भर दिला पाहिजे’, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर बारा तासांमध्ये परिणय फुके यांनी माफी मागितली नाही, तर शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत वाद उफाळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...