Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; राज्य सरकारचा निर्णय

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ८०% पेक्षा जास्त पाऊस झाला असून, १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या १००% पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी खरीप हंगामातील कामात व्यस्त असल्याने त्यांना निवडणुकीत भाग घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांमध्ये चिन्हांचे वाटप झाले आहे किंवा उच्च/सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, अशा संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या ३ हजार १८८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांपैकी ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील २८५ संस्थांच्या निवडणुका या आदेशामुळे लांबणीवर पडल्या आहेत.

ताज्या बातम्या

एनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर...