Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाचे मुंबईत एका दिवसात 79 रुग्ण ; 9 मृत्यू

कोरोनाचे मुंबईत एका दिवसात 79 रुग्ण ; 9 मृत्यू

सार्वमत

मुंबई – मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांत शहरात कोरोनामुळे 9 जण दगावले आहेत. विविध रुग्णालयांत दाखल असलेले 6 कोरोनाबाधीत गुरुवारी बरे झाले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने कोरोना साथीचा गुरुवारचा तपशील जारी केला आहे. त्यानुसार मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 775 वर पोहचली आहे (54 मृत्यू मिळून). आतापर्यंत शहरात एकूण 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 54 जण कोरोनाने दगावले आहेत. कोरोना सदृष्य लक्षणे असलेले आज 403 नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा कोरोना सदृष्य रुग्णांची संख्या आता 3 हजार 743वर पोहचली आहे.

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रामुख्याने जे कोरोनाबाधीत आहेत त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून आतापर्यंत अशा 2 हजार 806 जणांचा शोध घेऊन त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. शिवाय घरोघरी जाऊन दीड हजार जणांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. व्यापक सर्वेक्षणात आतापर्यंत 15 लाख नागरिकांपर्यंत महापालिकेची पथकं पोहचली आहेत.

कोरोनासाठी अत्यंत संवेदनशील भाग निश्चित करण्यात आले असून तिथे प्रतिबंध लादण्यात आले आहेत. या क्षेत्रांत कोरोना सदृष्य रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. अशी 40 क्लिनिक कार्यरत असून आतापर्यंत 442 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या