Friday, May 3, 2024
Homeनाशिक'करोना' जनजागृती अभियान बैठक

‘करोना’ जनजागृती अभियान बैठक

निफाड। प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे करोना जनजागृती अभियान राज्यभर सुरू आहे.

- Advertisement -

तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. या अभियानात प्रशासकीय यंत्रणेला आता शिवसैनिक कोविडदूत स्वयंसेवक म्हणून सहकार्य करणार असून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मा.आ. अनिल कदम यांनी केले आहे.

निफाड शासकीय विश्रामगृहात करोना जनजागृती अभियान बैठकीप्रसंगी मा.आ. कदम बोलत होते. यावेळी तहसीलदार दीपक पाटील, पं.स. विस्तार अधिकारी के.टी. गादड, कहांडळ, कोविड नोडल अधिकारी डॉ.शिंदे आदींसह अनिल कुंदे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, जि.प. सदस्य दीपक शिरसाठ, संजय कुंदे, संजय क्षीरसागर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील या अभियानाला प्रशासनाला शिवसैनिक कोविडदूत स्वयंसेवक म्हणून मदत करणार आहे.

अनिल कदम यांनी यावेळी बैठकीत मार्गदर्शन केले. निफाड व गोदाकाठमध्ये करोना टेस्टिंग लॅब व करोना सेंटर सुरू करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी अनिल कदम यांनी केले व प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले. तालुक्यातील आरोग्य सेवा संदर्भात तहसीलदार दीपक पाटील, नोडल अधिकारी डॉ.शिंदे व गादड यांनी यावेळी माहिती दिली. तालुक्यात करोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी दत्ता गडाख, पं.स. सदस्य शिवा सुरासे, विक्रम रंधवे, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, आशिष बागुल, सुधीर शिंदे, देवदत्त कापसे, शरद कुटे, अशपाक शेख, संजय दाते, शाम जोंधळे, भीमराव काळे, संदीप जाधव, दशरथ रूमणे, शुभम आव्हाड, आबा गडाख, नंदू राजोळे, सागर जाधव, भाऊसाहेब कमानकर, तानाजी पुरकर, दत्तू भुसारे, किरण सानप, नरेंद्र डेर्ले, साहेबराव डेर्ले, छोटू साळे, अरुण डांगळे, शिवा ढोमसे, स्वप्नील चकोर, बापू बोरगुडे, बस्तीराम खालकर आदींसह पदाधिकारी व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या