Friday, May 3, 2024
Homeनगर“उघडा आता साहेब...”; व्यापार्‍यांसाठी आमदारांनी केले 'हे' काम

“उघडा आता साहेब…”; व्यापार्‍यांसाठी आमदारांनी केले ‘हे’ काम

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

दीड-दोन वर्षांपासून करोना संकट (Corona crisis) काळात व्यापारी आर्थिक संकटात (financial crisis) सापडले आहेत. त्यांना धीर द्यावा लागणार आहे. मुंबई-पुणे (Mumbai-Pune) येथे सरकारने बाजारपेठा खुल्या केल्या. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ (Ahmednagar Market) खुल्या कराव्यात. शनिवार व रविवार दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) व व्यापारी शिष्टमंळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

- Advertisement -

प्रशासनाने बाजारपेठेसाठी 7 ते 4 ही वेळे ठरवून दिली आहे. त्यात बदल करून वेळ 11 ते 6 अशी करावी. त्यामुळे व्यापाराला थोडी चालना मिळेल. शहरातील उद्योग-व्यापारावर हजारो कामगारांची कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त

आमदार जगताप व व्यापारी शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांच्याशी चर्चा केली. व्यापारी सुभाष कायगावकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष बोरा, सचिन मुथा, उमेश बोरा, प्रेमराज पोखरणा, रवी गुजराती, राजेंद्र बोथरा, नाना बोजा आदी उपस्थित होते.

करोना काळात व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. नगर शहरातील बाजारपेठेवर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. वारंवारच्या लॉकडॉऊनमुळे बाजारपेठा उजाड होण्याची वेळ आली आहे. शहरातील व जिल्ह्यातील ग्राहक या बंदमुळे इतर जिल्ह्यांत खरेदीसाठी जाऊ लागला आहे. प्रशासनाने व्यापार्‍यांना दुकाने खुली ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी.

संतोष बोरा

- Advertisment -

ताज्या बातम्या