Friday, May 3, 2024
Homeधुळेजिल्ह्यातील 20 शिक्षकांना करोनाची लागण

जिल्ह्यातील 20 शिक्षकांना करोनाची लागण

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

मुंबई व ठाणे वगळता राज्यात दि.23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार असल्याने शिक्षकांना करोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात तळोदा व नंदुरबार प्रकल्पातंर्गत येणार्‍या 74 आश्रमशाळा व 78 कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे दोन हजार शिक्षकांची कोरोना चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे.

त्यापैकी 1 हजार 111 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असुन त्यात 20 शिक्षकांना कोरानाची लागण झाल्याचे आढळुन आले.

राज्यभर गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथमच दि.23 नोव्हेंरबपासून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

या पार्श्वभुमीवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना दि.22 नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय केंद्रावर तपासणीसाठी शिक्षकांची गर्दी होत आहे.

शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर अनेकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ज्ञट करण्याचे सुचविले होते. मात्र आरटीपीसीआर चाचणीचीच सक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 172 अनुदानित माध्यमिक शाळा, 56 विना अनुदानित शाळा, 87 अंशतः अनुदानित शाळा तसेच सीबीएई, इंग्रजी माध्यम किंवा स्वयंअर्थसहायीत अशा 73 शाळा, समाजकल्या अंतर्गत दोन शाळा तर 78 कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

यामध्ये 1 लाख 98 हजार 768 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण 5 हजार 845 शिक्षक व 1 हजार 158 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. यातील 9 वी ते 12 वीच्या शिक्षकांमध्ये 50 टक्केइतके 1 हजार 731 शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे 275 शिक्षक असे एकूण 2 हजार 6 शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 417 माध्यमिक शाळा असून 1 लाख 98 हजार 768 विद्यार्थी तर 5 हजार 845 शिक्षक आहेत. यात नंदुरबार तालुक्यात 112 माध्यमिक शाळा असून 1 हजार 662 शिक्षक आहेत. नवापूर तालुक्यातील 80 शाळांमध्ये 1 हजार 21 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत.

शहादा तालुक्यातील 95 शाळज्ञंमध्ये 1 हजार 579 शिक्षक कार्यरत आहेत. तळोदा तालुक्यात 41 शाळांमध्ये 523, अक्कलकुवा तालुक्यातील 56 शाळांमधील 692 तर धडगांव तालुक्यातील 33 शाळांमध्ये 368 शिक्षक आहेत. असे असले तरी दि.23 नोव्हेंबरपासून केवळ 9 वी ते 12 वीच्या वर्गांना सुरूवात होणार असल्याने या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांचीच कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.

त्यानुसार आज दि.21 रोजी सायंकाळपर्यत 1 हजार 111 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असुन त्यापैकी 20 शिक्षकांचा कोराना अहवाल हा पॉझीटिव्ह आला आहे.पैकी 10 शिक्षकांमध्ये कुठलेही लक्षणे आढळले नाहीत.यात नंदुरबार तालुक्यातील 15 , नवापूर तालुक्यातील 4 तर शहाद्यातील 1 शिक्षकांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या