Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मृत्यूतांडव मात्र कायम

COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मृत्यूतांडव मात्र कायम

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाली असली तरी महिनाभरापासून करोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार ५२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे.

New Covid Strain In Singapore : केजरीवालांच्या ‘त्या’ ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ८३ हजार २४८ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ वर पोहचली आहे.

ICMR दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. यामध्ये १३ लाख १२ हजार १५५ जणांचं लसीकरण मंगळवारी झालं.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील करोना आकडेवारीचा आलेख काही दिवसांपासून घसरता आहे. राज्यात काल २८ हजार ४३८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ५२ हजार ८९८ रुग्णांनी करोनावर मात केली. राज्यात ४ लाख १९ हजार ७२७ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.६९% झाले आहे. तसेच महाराष्ट्रात काल ६७९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या