Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक शहरातील पेठरोड परिसरातील १३ अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यात दिवसभरात २२ रुग्णांची भर

नाशिक शहरातील पेठरोड परिसरातील १३ अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यात दिवसभरात २२ रुग्णांची भर

नाशिक शहरात ११६ पॉझिटिव्ह; जिल्ह्याचा आकडा पोहोचला ९८४ वर 

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावला सध्या सरासरीत मागे टाकत नाशिक शहराने आघाडी घेतली आहे. शहरात करोनाचा उद्रेक सुरू झाला असून हा आकडा शंभरीपार गेला आहे. नाशिक शहरासह आज जिल्ह्याच्या विविध भागातील 21 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नाशिकमध्ये 115 तर जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 983 वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एका पोलीस सेवकाचा समावेश आहे यामुळे नाशिक शहराची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात जिल्ह्यातील 21 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. यात नाशिक शहरातील 19 जणांचा समावेश आहे. शहरातील वडाळा येथील 3, पेठरोड व रानगर परिसरातील 13, महाराणा प्रताप चौक येथील 2, पुणा रोडवरील आशिर्वाद स्टॉप येथील एकाचा यात सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 115 वर पोहचला आहे.

नाशिक शहरात सोमवारी (ता. 25) सकाळी 2 कोरोनाबाधित दोघांचा बळी गेला असून यात पोलीस हवालदाराचा समावेश आहे. तर दुसर्‍या पंचवटीच्या पेठरोड परिसरातील 36 वर्षीय व्यक्ती कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे.

गेल्या गुरुवारी (ता. 21) ते महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल झाले असता, त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. तसेच, ते मधुमेहग्रस्त होते. दाखल झाल्यापासून त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलेले होते.

परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना गेल्या रविवारी (ता.24) जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी (ता.25) सकाळी निधन झाले.

यामुळे शहरात मृत्यु झालेल्यांचा आकडा 5 वर गेला आहे. तर जिल्ह्यात एकुण 52 मृत्यू झाले आहेत.तसेच आज दिवसभरात 12 करोनाग्रस्त रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 728 वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 43 हजार 969 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 10 हजार 148 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

यातील 8 हजार 748 निगेटिव्ह, 983 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 187 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 432 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 55 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 21, जिल्हा रूग्णालय 13, ग्रामिण 17, मालेगाव 4 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

दुसरा पोलीस शहिद

आज नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार दिलीप घुले (50) यांचा मृत्यू झाला यामुळे दुसरा पोलीस शहिद झाला असून पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी हिरावाडीतील पोलिस हवालदाराही कोरोनामुळे मयत झाले आहेत. घुगे यांना बंदोबस्ताचा कालावधी आटोपल्यानंतर त्यांना आठवडाभर घरी सोडण्याऐवजी क्वारंटाईन करण्यात आल होतेे.

त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. त्यानंतर ते घरी आले. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ते डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात भरती झाले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता, सोमवारी (ता. 25) त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. दिलीप घुले हे मूळचे नायगाव (ता. सिन्नर) येथील रहिवाशी असून त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित: ९८४
* मालेगाव : ६९१
* नाशिक : ११५
* उर्वरित जिल्हा : १३४
* जिल्हा बाह्य ः  ४३
* एकूण मृत्यू: ५२
* कोरोनमुक्त : ७२०

- Advertisment -

ताज्या बातम्या