Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात करोना चाचण्यांचे दर आणखी घटले

राज्यात करोना चाचण्यांचे दर आणखी घटले

मुंबई | Mumbai

खासगी प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या करोना चाचण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे नव्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1 हजार 400 आणि 1 हजार 800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत. करोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सरकारी लॅबमध्ये सर्व चाचण्या मोफत आहेत. मात्र, खासगी लॅबमध्ये पैसे आकारले जातात. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सर्व टेस्टिंग लॅबने याची दखल घ्यावी आणि कमी केलेले दर आकारावेत, अशी विनंती टोपे यांनी केली.

Covid-19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत घट

राज्यात मागील २४ तासात ६ हजार ०५९ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १६ लाख ४५ हजार ०२० एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ५ हजार ६४८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४ लाख ६० हजार ७५५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ४१ हजार ०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४३ हजार २६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या