Friday, May 3, 2024
Homeजळगावदोन दिवसांच्या बंद नंतर होणार लसीकरण

दोन दिवसांच्या बंद नंतर होणार लसीकरण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता.

- Advertisement -

त्यामुळे शहरासह जिल्ह्यात दोन दिवस लसीकरणाला ब्रेक लागला होता. दरम्यान बुधवारी 7 हजार 100 लसी उपलब्ध झाल्याने दोन दिवसांच्या बंदनंतर जिल्ह्यात लसीकरण गुरुवारपासून पुन्हा सुरुवात होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आज बुधवारी 4 हजार 700 कोव्हीशिल्ड तर 2 हजार 400 को-व्हॅक्सिन असा एकूण 7 हजार 100 लसींचा साठा नाशिक सर्कल विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पोटोडे यांनी दिली.

लसीकरणाच्या दुसर्‍या डोसला प्राधान्य

जळगाव शहरात छत्रपती शाहूमहाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, नाणीबाई रुग्णालय, मुल्तानी रुग्णालय, शाहीर अमरशेख रुग्णालय, चेतनदास रुग्णालयात कोविशिल्डचा दुसरा डोस तर स्वाध्याय भवन, कांताई नेत्रालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध असल्याची माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या