Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्हा शल्य चिकीत्सकाने धुडकावला लसीकरणाचा नियम

जिल्हा शल्य चिकीत्सकाने धुडकावला लसीकरणाचा नियम

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

लस घेतल्यानंतर प्रत्येकाला अर्धा तास वैद्यकीय पथकाच्या निरक्षणासाठी बसविले जात होते. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोेजीराव चव्हाण यांनी लस टोचून घेतल्यानंतर लागलीच ते लसीकरण कक्षाच्या बाहेर पडल्याचा प्रकार आज सकाळी घडला.

- Advertisement -

त्यामुळे वरिष्ठांकडूनच शासनाच्या नियम धुडकाविले जात असल्याने शासनाचे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच असता का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यासह देशभरात आज पासून कोरानाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांनी लस टोचून नागरिकांमध्ये आदर्श निर्माण केला होता. परंतु जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी लस टोचून सर्व सामान्यांच्या मनातली भीती दूर केली.

मात्र लस टोचल्यानंतर निरीक्षण कक्षात अर्धातास वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणात न थांबता ते थेट कक्षाबाहेर निघून गेल्याने जिल्हा शल्य चिकीत्सकांनी सर्वात आधी लस टोचून निर्माण केलेला आदर्श घ्यावा की त्यांनी मोडलेल्या निमयमांची अंमलबजावणी करावी असा प्रश्न उपस्थितांकडून केला जात होता.

शासनाचे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच का?

लस घेतल्यानंतर त्याचा शरीरावर साईड इफेक्ट होत नाही ना यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु वरिष्ठ अधिकारी असलेले जिल्हा शल्य चिकीत्सकांनी हे नियम पायदळी तुडवीत ते अवघे काही मिनीटच त्याठिकाणी उपस्थित राहिल्याने हे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच का? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रोटोकॉल महत्वाचा की नियम

लसीकरणाच्या शुभारंभाला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर पालकमंत्री लसीकरण कक्षातून बाहेर पडीत ते मार्गस्थ झाले. मात्र जिल्हा शल्य चिकीत्सकच त्यांच्या मागे कक्षातून बाहेर पडल्याने जिल्हा शल्य चिकीत्सकांना शासकीय नियम महत्वाचे की प्रोटोकॉल महत्वाचा होता असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या