Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाच संकट संपलेले नाही; नागरिकांनी काळजी घ्यावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोनाच संकट संपलेले नाही; नागरिकांनी काळजी घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमाद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला .

- Advertisement -

संपूर्ण जग, देश व राज्य करोनाच्या सावटाखाली आहे, पाशात्य देशां मध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. आपण सर्वानी ह्या बाबत गांभीर्याने विचार करून काळजी घेणे गरजेचे आहे .

धार्मिक स्थळे आपण खुली केली आहे परंतु तिथे गर्दी न करू नका. दसरा ,दिवाळी, छटपूजा आदी सर्व सणांना नागरिकांनी नियम पाळले त्याच प्रमाणे येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेस आपण गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे .

करोनाची लस अजून पर्यंत आलेली नाही , नागरकानी स्वतः हुन काळजी घ्यावी . माझं कुटुंब माझी जवाबदारी ह्या अंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रमाण समजण्यास मदत झाली आहे.

सर्व यंत्रणा करोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यास सज्ज असली तरी नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने करोनचा संकट कमी होणे साठी हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे ह्या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या