Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात तिसर्‍या लाटेत कोरोनाचा पहिला बळी

जिल्ह्यात तिसर्‍या लाटेत कोरोनाचा पहिला बळी

जळगाव । Jalgaon

जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. बुधवारी तब्बल 285 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून जळगाव शहरातील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात तिसर्‍या लाटेचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणेचेही धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात बुधवारी जळगाव शहर 50, जळगाव ग्रामीण 17, भुसावळ 135, अमळनेर 5, चोपडा 22, पाचोरा 3, धरणगाव 2, यावल 1, जामनेर 3, पारोळा 5, चाळीसगाव 29, मुक्ताईनगर 12 व अन्य जिल्ह्यातील 1 असे एकूण 285 नवे बाधित आढळून आले. भडगाव, एरंडोल, रावेर, बोदवड या चार तालुक्यांमध्ये एकही नवा बाधित आढळून आलेला नाही. तसेच जिल्ह्यात आज 19 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 43 हजार 892 एवढ्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 40 हजार 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 580 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत 1 हजार 32 ऍक्टीव रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

अ‍ॅक्टीव्ह रुग्ण हजारीपार

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या सुपरस्प्रेडला सुरुवात झाली आहे. दहाच्या आत असलेल्या कोरोनाने आठवड्याभरापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच गेल्या आठवड्यात शंभराच्या आत असलेल्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत तीन ते चार दिवसात वाढ होवून आता आकडा हजारी पार गेला आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका अधिक गडद होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव, भुसावळ ठरतेय हॉटस्पॉट

जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. मात्र यात जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. यातच बुधवारी जळगाव शहरात 50 तर भुसावळात सलग दुसर्‍या दिवशी 135 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जळगाव व भुसावळ हे जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु पाहत आहे.दरम्यान, जळगाव शहरातील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 2 हजार 580 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या