Friday, May 3, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात आणखी १७ करोनाबाधित

अकोले तालुक्यात आणखी १७ करोनाबाधित

अकोले (प्रतिनिधी) | Akole –

अकोले शहरातील शिडफार्म, कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगरसह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतुळ येथील तब्बल १७ व्यक्ती आज गुरुवारी करोना बाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. coronavirus

- Advertisement -

काल बुधवारी राञी खाजगी अहवालात शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत ( शिडफार्म) मध्ये एका व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता तर शहरातील कारखाना रोड भागातील करोना अहवाल पॅाझिटीव्ह आलेल्या एका वृद्धाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या निमित्ताने तालुक्यातील करोनाचा हा सातवा बळी ठरला आहे.

तालुक्यातील खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये आज दुपारी ७७ जणांची रॅपिड ॲन्टीजन करोना टेस्ट घेण्यात आली. यामध्ये शहरातील शिडफार्म ०१, शिवाजीनगर ०१,शेटे मळा ०१,धुमाळवाडी ०१,समशेरपुर ०४,हिवरगाव आंबरे ०६ व कोतुळ ०३ असे १७ जणांचे अहवाल आज पॅाझिटीव्ह आले आहेत.शहरातील शिडफार्म येथील ६५ वर्षिय महीला, शिवाजीनगर ५० वर्षिय पुरुष, शेटेमळा २२ वर्षिय तरुण, धुमाळवाडी ३८ वर्षिय पुरुष , समशेरपुर येथील ४६ वर्षीय पुरुष,१८ वर्षिय तरुण, ४० व २० वर्षिय महिला, हिवरगाव आंबरे येथील ६५ वर्षिय,४० वर्षिय, ३२ वर्षिय, ४० वर्षिय पुरुष ६० वर्षिय ३२ वर्षिय महीला तर कोतुळ येथील ३६ वर्षिय पुरुष, २८ वर्षिय व २९ वर्षिय महिला अशा एकुण १७ जणांचे करोना अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत.

तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या २४५ झाली आहे. त्यापैकी १६८ व्यक्ती करोनामुक्त झाले असून सात जण दगावले आहेत. तर ७१ व्यक्तीवर सध्याउपचार सुरू आहे.दिवसेंदिवस अकोले शहर व तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरी प्रशासन मात्र थंड पडल्याचे दिसत आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक स्वरूपात अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.अन्यथा शेजारच्या संगमनेर सारखी परिस्थिती अकोलेतही उद्भवली तर नवल वाटू नये असा सूर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या