Friday, May 3, 2024
HomeनगरCoronavirus : नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर तहसीलदारांची कारवाई

Coronavirus : नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर तहसीलदारांची कारवाई

सुपा l वार्ताहर

पारनेरच्या तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी गुरुवारी दुपारी सुपा येथे अहमदनगर-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची झाडाझडती घेत करोना विषयक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली.

- Advertisement -

पारनेर तालुक्यांमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे नागरिकांकडून पालन केले जाते का यासंदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील गावांना भेटी देत नियमावलीची अंमलबजावणी होत नसेल तेथे जात कारवाई केली आहे.

सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यवसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली असून नगर-पुणे महामार्गावर जाणाऱ्या प्रवासी वाहतूक बसची पाहणी केली. त्यातील १५ ते २० प्रवाशांवर मास्क न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

एसटी गाड्यांतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. या प्रवासात करोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. यामुळे शहरात वाढत असलेला संसर्ग आता गाव-खेड्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसमधील अनेक प्रवासी मास्कचे साधे नियमही पाळले जात नाहीत.

एसटीच्या गाड्यांतून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही. त्यामुळे प्रवासातच करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही. यामुळे करोना नियमांना पायदळी तुडवून हजारोंच्या संख्येने वाहतूक सुरू आहे. यासाठी तहसीलदार ज्योती देवरे सुपा बसस्थानक चौकामध्ये नगर तसेच पुणे या शहरातून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांबून नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या