Friday, May 3, 2024
Homeनगरअकोलेत ‘इतके’ नवे करोना बाधित

अकोलेत ‘इतके’ नवे करोना बाधित

अकोले (प्रतिनिधी) –

अकोले तालुक्यात कालचा गुरूवार समाधानकारक ठरला आहे. तालुक्यात काल

- Advertisement -

07 करोना बाधित आढळले आहेत.तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 2134 झाली आहे.

काल तालुक्यात घेण्यात आलेल्या 263 रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 02 व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 05 अशा 07 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला .

खानापूर कोव्हिड सेंटर येथून काल 53 व कोतूळ ग्रामीण रुग्णालयातून 25 अशा एकूण 78 व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष आनंदाची बाब म्हणजे अभिनव शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली यात सर्वच्या सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

काल तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये तिरडे येथील 68 वर्षीय महिला, लिंगदेव येथील 18 वर्षीय तरुण तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील कारखाना रोड येथील 46 वर्षीय पुरूष, माळीझाप येथील 31 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय तरुण, चितळवेढे येथील 41 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष अशा दिवसभरात एकूण 07 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.तालुक्यात रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असल्याने प्रशासन व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.एकूण रुग्णसंख्या 2134 झाली आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या 2010 आहे.तर 26 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 94.19 टक्के इतके झाले आहे तर तालुक्याचा मृत्युदर फक्त 1.29 टक्के आहे.संसर्गाचा दर 16.45 टक्के एवढा आहे.सध्या तालुक्यात एकूण 98 बाधितांवर उपचार सुरू आहेत.आजपर्यंत एकूण 10,667 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या,त्यात आर टी पी सी आर चाचण्यांची संख्या 2302 एवढी आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 1330 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 9337 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.आर. टी. पी. सी. आर. मध्ये 799 पॉझिटिव्ह तर 1503 निगेटिव्ह आढळले .तालुक्यातील 191 गावांपैकी 101 गावांत आजपर्यंत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत चालले आहे ही समाधानाची बाब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या