Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज

- Advertisement -

17 हजार 433 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे बुधवारी 292 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली. दरम्यान यानंतर राज्यातील उपचाराखाली असलेल्या करोनाबाधितांची संख्या 2 लाखांच्यावर पोहोचली आहे. तर राज्यातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येनंही 25 हजारांचा टप्पा पार केला असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

बुधवारी राज्यात 17 हजार 433 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर 292 रुग्णांचा मृत्यू झाल्याची झाला आहे. दरम्यान, राज्यात 2 लाख 1 हजार 703 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 496 जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 25 हजार 195 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभरात 13 हजार 959 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 72.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 42 लाख 84 हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 8 लाख 25 हजार 739 करोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या